Vice-Principal’s Desk

  • Home
  • Vice-Principal’s Desk

Vice Principal’s Desk

Vice Principal


प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
“तमसो मा ज्योतिर्गमय” हे ब्रीद घेवून जनसामान्यांच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचं काम अविरतपणे करणारी “DAV” (Dayanand Anglo Vedic) ही देशातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था.. स्वामी दयानंद सरस्वतींच्या विचाराने प्रेरित होवून सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेच्या देशविदेशात हजारो शाखा आहेत. सोलापूरची दयानंद शिक्षण संस्था ही त्यातीलच एक..आपण सर्वजण या परिवाराचा भाग झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या सर्वांचे मनःपुर्वक स्वागत…

मित्रांनो, शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे व्यक्तीचा सर्वांगिण विकास करणे आणि तो साधण्यासाठी दयानंद महाविद्यालय हे संवाद, संस्कार, सुरक्षा आणि संगणीकृत शिक्षण या मुद्यावर काम करत आहे.महाविद्यालयाच्या परिसरात तुमच्या विकासासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.महाविद्यालयात असलेल्या भव्य प्रयोगशाळा, ICT, ई लर्निंग ,ग्रंथालय, क्रीडांगण या सुविधांचा आपण भरपूर फायदा करून घ्यावा. महाविद्यालयाने विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता अनेक शैक्षणिक उपक्रम चालू केले आहेत. त्यांचाही उपयोग करून घ्यावा.शिक्षकांशी संवाद साधत आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा जरूर प्रयत्न करावा. केवळ परीक्षार्थीं न राहता आपण ज्ञानार्थी व्हावे.आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शोषित, पीडित, शैक्षणिक प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या घटकांसाठी कसा होईल याचा विचार करावा. सामाजिक जाणिवांचं भान ठेवत एक उत्तम नागरिक,संवेदनशील माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. दयानंद शिक्षण संस्था नेहमीच मानवी मूल्यांचं जतन आणि संवर्धन करते आहे. हे काम आपण ही करावे. संस्था कायम आपल्या सोबत राहील.पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत सजग राहून निर्णय घ्यावेत हीच अपेक्षा.

आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा…!

श्री. अरुण भि. खांडेकर
उप प्राचार्य